आपल्या संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष राजीवजी सहस्त्रबुद्धे यांनी शुक्रवार, दि. २२ जून २०१८ रोजी सकाळी भारताचे संरक्षण राज्यमंत्री मा. डाॕ. सुभाष भामरे यांची पुण्यात सदिच्छा भेट घेतली. यावेळी मा. राजीवजींनी मंत्रिमहोदयांना आपल्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेला भेट देण्याचे निमंत्रण दिले. संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. सदस्य डॉ. माधव भट व अॕड. धनंजय खुर्जेकर या प्रसंगी उपस्थित होते.