आपल्या शाळेत गतवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार, दि. ९ एप्रिल २०१८ रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध मान्यवर , परिसरातील इतर पालक आणि बालचमूंनी याप्रसंगी फनी गेम्स, जादूचे प्रयोग, आणि खाऊ गल्लीचा मनसोक्त आनंद लुटला. प्रशालेतर्फे एकूण १५ लकी ड्रॉ बक्षिसांचेही वितरण केले गेले. तसेच, मेळाव्यात आलेल्या बालचमुंना मिनिओज आणि डोरेमोन या कार्टुन्सना भेटण्याचीही संधी मिळाली.