आपल्या प्रशालेतील १९७७-७८ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे मंगळवार, दि. ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रशालेला वर्गातील फलक देण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन शाळेस मदत करण्यासाठी शाळेचा माजी विद्यार्थी संघ नेहमीच तत्पर असतो. ज्या शाळेने आपल्याला शिकवले, घडवले, शाळेच्या बाहेरील जगात वावरण्यासाठी तयार केले, त्या शाळेच्या ऋणात राहूनच दातृत्वाचा आदर्श पुढील पिढीसमोर ठेवण्यासाठी माजी विद्यार्थी प्रतिनिधी श्री. राजेंद्र मराठे यांनी शाळेतील प्रत्येक वर्गासाठी हे फलक प्रदान केले. या फलक अर्पण सोहळ्याचे आणि शाला समिती अध्यक्ष श्री. भालचंद्र पुरंदरे यांनी प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांची आदर्श व अभिमानास्पद परंपरा सांगून कृतज्ञता व्यक्त केली. मुख्याध्यापक श्री. भारमळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापिका सौ. कांता ईष्टे, पर्यवेक्षिका सौ. भारती तांबे तसेच सकाळ आणि दुपार विभागाचे शिक्षक व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. अनेक माजी विद्यार्थी यावेळी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. योगिता चौकटे यांनी केले.