आज दिनांक ११ जुलै २०१७ रोजी ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री. मंगेश तेंडुलकर यांचे पहाटेच्या सुमारास पुणे येथे निधन झाले. अगदी बोलक्या व जीवंत वाटाव्यात अशा विनोदी चित्र रेखाटनासाठी ते सुप्रसिद्ध होते; ‘व्यंगचित्रकार’ म्हणून त्यांची कीर्ती जगभर दुमदुमली होती, त्याबरोबरच एक लेखक म्हणूनही ते ओळखले जात होते. त्यात प्रामुख्याने 'भुईचक्र', 'पॉकेट कार्टून्स' आणि 'संडे मूड' यांसारख्या पुस्तकांचा समावेश होतो.

वि.मा. दीक्षित-पटवर्धन तथा विमादी हे एक विनोदी लेखन करणारे मराठी लेखक होते. सावानातर्फे विनोदी लेखन करणार्‍या मराठी लेखकाला विमादी पटवर्धन यांच्या नावाचा पुरस्कार देण्यात येतो.'संडे मूड’ पुस्तकासाठी हा ‘वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार’ श्री. तेंडुलकर यांना मिळाला होता. त्याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'चिं.वि. जोशी पुरस्कार’ देखील त्यांना मिळाला होता.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मुलांचे (पेरूगेट) भावे हायस्कूल’चे ते माजी विद्यार्थी होते, संस्थेला त्यांचा सार्थ अभिमान आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.