बाल शिक्षण मंदिरच्यामाजी मुख्याध्यापिका श्रीमती विद्या बापट कालवश
बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रस्ता शाळेतील माजी शिक्षिका व शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती विद्या बापट यांचे बुधवार, दि. २३ ऑगस्ट रोजी रात्री दुखःद निधन झाले.
त्या ३८ वर्षे संस्थेच्या सेवेत होत्या. २००२ ते २००७ या काळात बापट बाई भांडारकर रस्त्यावरील बाल शिक्षण मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. तिथूनच त्या २००७ साली सेवानिवृत्त झाल्या. नाट्य, गायन, वक्तृत्व अशा गुणांनी त्यांचे व्यक्तिमत्व संपन्न होते. त्यामुळेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली  शाळेने अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली. त्या लेखिका म्हणून प्रसिध्द होत्या. दूरदर्शनवर त्यांची अनेक बालनाट्य खूप गाजली. पुणे जिल्हा परिषदेचा मा.  यशवंतराव चव्हाण आर्दश शिक्षक पुरस्कार, सौ. पार्वतीबाई जगताप पुरस्कार, पुणे महानगर पालिकेचा आर्दश शिक्षक पुरस्कार हे व यासारखे अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. माजी विद्यार्थ्यांशी त्यांचा उत्तम संपर्क होता. त्यांच्या या संघटन कौशल्यामुळेच देश-परदेशातील अनेक कर्तबगार विद्यार्थी त्यांच्या संपर्कात होते. बापट बाईंना भावपूर्वक श्रद्धांजली!