म.ए.सो. ‘गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स’ला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘सुवर्ण आठवणींचा गोफ’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते. सन १९६७ ते सन २०१७ हा एक कालपटच महाविद्यालयाने यानिमित्ताने उभा केला होता. नियतकालिके व छायाचित्रे यांच्यासमवेत माजी विद्यार्थी तसेच माजी शिक्षकांना जुन्या आठवणींत रमण्याची ही एक नामी संधी महाविद्यालयाने दिली होती.
प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे सल्लागार समितीचे अध्यक्ष C.A. अभय क्षीरसागर, प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणी, संस्थेचे माजी सचिव र.वि. कुलकर्णी, संस्थेचे अन्य पदाधिकारी व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत सुवर्णमहोत्सवचा हा ऐतिहासिक सोहळा उत्साहात पार पडला.