''निर्भय भारत' अश्वारोहण मोहिमेत सहभागी झालेल्या अश्वतेजांचे कौतुक करण्यासाठीतसेच शाळेतील शिक्षक आणि मोहीम यशस्वी होण्यासाठी योगदान दिलेल्या सर्वांचा सत्कार करण्यासाठी शनिवार, दि. ४ फेब्रुवारी २०१७ रोजी मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. प्र.ल. गावडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 'मएसो'च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष मा. विवेक शिंदे, नियामक मंडळाच्या सदस्य आणि शाळा समितीच्या प्रमुख डॉ. माधवी मेहेंदळे, नियामक मंडळाचे सदस्य व मोहिमेचे प्रमुख मा. भालचंद्र पुरंदरे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ, पूजा जोग व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार्थींना मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देण्यात आले.
शाळेच्या महामात्र सौ. चित्रा नगरकर, शाळा समिती सदस्य डॉ. मानसी भाटे, नियामक व आजीव सदस्य मंडळाचे माजी सदस्य मा. आर.व्ही. कुलकर्णी तसेच मोहिमेचे अन्य एक प्रमुख प्रा. शैलेश आपटे आदी मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.