महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनी उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धांच्या 'म.ए.सो. क्रीडा करंडक २०१६-१७' चे उद्धाटन आद अतिशय उत्साहाच्या वातावरणात झाले. अर्जुन पुरस्कार विजेते क्रीडापटू मा. हेमंत टाकळकर हे प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीवजी सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष मा. विवेकजी शिंदे, मएसोचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे, नियामक मंडळाचे सदस्य आणि मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. भालचंद्र पुरंदरे, मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र मा. सुधीर भोसले, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक मा. शैलेश आपटे, नियामक मंडळाचे सदस्य मा. आनंदराव कुलकर्णी, मा. जयंतराव म्हाळगी तसेच मा. राजीव देशपांडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. मएसो प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा जांगळे, मएसो इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका कु. ज्योति क्षिरसागर, मएसो कै. ग.भि. देशपांडे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भ.ए. चव्हाण आणि मएसो सौ. नि.ह. देशपांडे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल खिलारे हे देखील यावेळी उपस्थित होते. 'म.ए.सो. क्रीडा करंडक २०१६-१७' निमित्त आज सकाळी शोभायात्रा काढण्यात आली होती.