Shri Sharad Pawar

Shri Prakash Javdekar

Shri D S Kulkarni

Sau Sucheta Bhide-Chapekar

Air Marshal Bhushan Gokhale(Retd)

Dr Charudatta Apte

Sau Kirti Shiledar

Shri Sanjeev Abhyankar

Smita Patil

Welcome To MES

The city of Pune, today is known as the nucleus of education. The city owes this reputation to several educational institutes.
The Maharashtra Education Society holds an important share.

In 1860 Maharashtra Education Society (MES), formerly known as the 'Poona Native Institutions', was founded by Vaman Prabhakar Bhave, Vasudev Balvant Phadke and Laxman Narhar Indapurkar. The great revolutionary freedom fighter Vasudev Balvant Phadke was the first Secretary and treasurer of Maharashtra Education Society. MES was formed with the aim of planting nationalistic thoughts and creating a generation of strong character and ideals. The last 152 years stand testimony to the fact that the aims of the society have been achieved. MES has given several gems in various fields, not just to Maharashtra but also to the nation.
What started as a simple, single seed is now an enormous tree - 'The Dnyan Vruksha'.

Identifying the changing needs of the times and with a vision of the future, MES has achieved several novel targets. Little pathways of yester years have now transformed into a huge boulevard. The growing capacity of MES has made it inevitable for the society to branch out of Pune into places like Saswad, Baramati, Panvel, Belapur, Kalamboli, Shirwal, Kasar Amboli and Nagar. The society is also operational in Chiplun through the ayurvedic education and services.

Latest News

Upcoming Events

आवाहन

 

  Click Here To Know More

 

म. ए. सो. : आमचे स्फूर्तिस्थान - विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या स्थापनेला दि. १९ नोव्हेंबर २०१८ रोजी १५८ वर्ष पूर्ण होत आहेत. या संस्थेच्या वाघीरे विद्यालय, सासवड या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून म.ए.सो. च्या कौतुकास्पद कामगिरीचा मला सार्थ अभिमान आहे. 

आज मला एका वेगळ्याच गोष्टीचा आनंद होत आहे तो म्हणजे मी स्वतःशीच केलेल्या दृढ निश्चयाचा व संकल्पपूर्तीचा!... ‘I.A.S. होऊन देशसेवा – समाजसेवा करण्याचा संकल्प’; ज्या ध्येयाने आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे व लक्ष्मण नरहर इंदापूरकर या त्रयींनी देशसेवेसाठी, समाजसेवेसाठी ही संस्था स्थापन केली, तसेच ध्येय ठेवून आपणही प्रशासकीय अधिकारी व्हायचे हा संकल्प पूर्णत्वाला गेला. तो स्वप्नपूर्तीचा आनंद काही वेगळाच होता. 

१५८ वर्षांपूर्वी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी एक भव्य, उदात्त विचाराने शिक्षणाचे बीज महाराष्ट्रभूमीत पेरले. त्यांच्या समोर स्वप्न होते की, या संस्थेतून अशाप्रकारचे शिक्षण दिले जाईल की, ज्यायोगे विद्यार्थ्यांवर मानसिक, शारीरिक, बौद्धिक संस्कार होतील व नैतिकदृष्ट्या परिपूर्ण असलेली एक युवापिढी तयार होईल, जिचे राष्ट्रीय चारित्र्य भारतमातेच्या सेवेत सर्वस्वाचा त्याग करण्यास हसत-हसत तयार होईल. त्यावेळी त्यांना कदाचित वाटलेही नसेल की, म.ए.सो. च्या या लहान बीजाचे १५८ वर्षांनंतर एका महान ज्ञानवृक्षात रुपांतर होईल. त्यांनी ज्या स्वतंत्र भारत देशासाठी बलिदान केले त्या स्वातंत्र्याच्या रक्षणाची व भविष्यातील समृद्धीची एक मोठी जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. मला नेहमीच वाटत आले आहे की, १९४७ साली आपणांस फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळाले, स्वराज्य आणि सुराज्य खऱ्या अर्थाने अजून साकार व्हायचे आहे. देशातील बहुसंख्य जनता अजूनही दारिद्र्याच्या, अज्ञानाच्या, सामाजिक विषमतेच्या अंधारात खितपत पडली आहे. मला मनोमन वाटते की, १९४७ पूर्वीच्या राजकीय स्वातंत्र्याच्या लढाईपेक्षा या पुढील काळातील सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याची लढाई अधिक आव्हानात्मक आहे.

Read More >> MES Knowledge Tree

 

विद्यादान


विद्यादानासाठी झटणारी तरुणाई
 

शिक्षण हा विकासाचा राजमार्ग आहे हे आपण सगळेजण जाणतोच, पण समाजातील फार मोठा वर्ग असा आहे ज्याला परिस्थितीमुळे शिकता येत नाही. समाजातील अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी आपल्या ‘पॉकेटमनी’तून केलेल्या बचतीचा विनियोग विद्यादानासाठी करणारी तरुणाई आज सर्वांसाठी खरोखरच आदर्शवत आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगांवचा अजय भोसले, पुण्यातील संस्कार मोरे, लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचा युवराज जाधव, लातूर जिल्ह्यातील उदगीरचा सचिन खडके, पुण्यातील अनामिका किलसे, तृप्ती बाटुंगे आणि भाग्यश्री बोराटे हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पहिल्या वर्षात शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी, कॉलेजमध्ये दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या ‘निनाद’ या भित्तीपत्रकाच्या निमित्ताने एकत्र आले आणि ‘आपणही समाजाचे काही देणे लागतो’ या सामाजिक जाणीवेने एकमेकांशी चांगलेच जोडले गेले. ही जाणीव केवळ विचारांपुरती आणि गप्पांपुरती मर्यादित न ठेवता या ‘निनाद ग्रुप’ने ती प्रत्यक्षात उतरवली. समाजातील होतकरू आणि गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने सुरू केलेल्या ‘विद्यादान निधी’मध्ये योगदान देऊन त्यांनी एक आदर्शच निर्माण केला आहे.
दौंड तालुक्यातील पारगांवमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील बहुतेक विद्यार्थी हे ऊसतोड कामगारांची मुले आहेत. वर्षानुवर्षे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या या गटातील विद्यार्थ्यांना आता शिक्षणाची दारे खुली झाली असली तरी त्यांना पुरेसे शैक्षणिक साहित्य आणि खेळाचे साहित्य मिळत नाही हे लक्षात घेऊन ‘निनाद’ ग्रुपने गेल्या दिवाळीच्या सुटीत शाळेल हे साहित्य भेट दिले. गावांमध्ये जाणवणाऱ्या प्रदुषणावर मात करण्यासाठी पारगांव, देलवडी, नांदगाव आणि निमोणे या चार गावांमध्ये सावली देणारी तीस झाडे शाळांबरोबरच रुग्णालयाच्या परिसरातही त्यांनी लावली आहेत. जागरूकपणे ती सर्व झाडे आजही जिवंत आहेत याची खातरजमाही केली आहे. दिवाळीचा आनंद लुटत असताना या ध्येयवेड्यांना समाजातील वंचितांचा विसर पडला नाही. दौंड शहरातून जुने पण चांगल्या स्थितीतील कपडे त्यांनी जमा केले. ते व्यवस्थित धुवून आणि इस्त्री करून तब्बल ४५० ड्रेस त्यांनी ऊसतोड कामगारांना दिले.
हे सगळं का केलंत?, एवढ्यावरच थांबणार का? या प्रश्नांना या तरुण-तरुणींनी दिलेली उत्तरे देशाच्या भविष्याकाळाबद्दल आश्वासकता निर्माण करणारी आहेत. तरुणवर्गात सामाजिक जबाबदारीचे भान येणे महत्त्वाचे आहे असे सांगताना तृप्ती म्हणाली, “सगळेच प्रश्न पैशाने सुटत नाहीत त्यासाठी जाणीव निर्माण करण्याची आवश्यकता असते, महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणाच्या बाबतीत याची खरी गरज आहे.”
“अमलीपदार्थांच्या विरोधात कॉलेजमध्ये जागृती करायची आहे. परस्परांबद्दल आदराची भावना जपली पाहिजे, दिखावूपणाला बळी पडून पैशांची उधळपट्टी न करता त्याचा योग्य तो विनियोग केला पाहिजे.” हे विचार त्यांच्यावर झालेल्या संस्कारांची साक्षच देत होते.
“आपला भारत देश गेली अनेक वर्षे विकसनशील आहे पण तो विकसित कधी होणार?” हे अनामिकाचे उद्गार कोणालाही अंतर्मुख करणारे आहेत.
विभिन्न कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या या तरूणांनी एकत्र येऊन समाजाचे हित साधण्यासाठी आपला मार्ग निवडला आहे, आता विकासाची आस असलेल्या होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी आपण काय करणार हा प्रश्न महत्वाचा आहे!महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ‘निनाद ग्रुप’ने संस्थेच्या विद्यादान निधीमध्ये दिलेले योगदान स्वीकारताना संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे. यावेळी नियामक मंडळाच्या सदस्य डॉ. केतकी मोडक आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर हेदेखील उपस्थित होते.

Click Here To Know More - विद्यादान निधी

MES Alumni

 

 MES Alumni

 

 

 

MES Alumni