Shri Sharad Pawar

Shri Prakash Javdekar

Shri D S Kulkarni

Sau Sucheta Bhide-Chapekar

Air Marshal Bhushan Gokhale(Retd)

Dr Charudatta Apte

Sau Kirti Shiledar

Shri Sanjeev Abhyankar

Smita Patil

Latest News

Upcoming Events

 

Interdisciplinary International Conference

17 - 18 Jan, 2019 

 

  Click Here To Know More

 

 

आवाहन

 

  Click Here To Know More

म. ए. सो. : आमचे स्फूर्तिस्थान - विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या स्थापनेला दि. १९ नोव्हेंबर २०१८ रोजी १५८ वर्ष पूर्ण होत आहेत. या संस्थेच्या वाघीरे विद्यालय, सासवड या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून म.ए.सो. च्या कौतुकास्पद कामगिरीचा मला सार्थ अभिमान आहे. 

आज मला एका वेगळ्याच गोष्टीचा आनंद होत आहे तो म्हणजे मी स्वतःशीच केलेल्या दृढ निश्चयाचा व संकल्पपूर्तीचा!... ‘I.A.S. होऊन देशसेवा – समाजसेवा करण्याचा संकल्प’; ज्या ध्येयाने आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे व लक्ष्मण नरहर इंदापूरकर या त्रयींनी देशसेवेसाठी, समाजसेवेसाठी ही संस्था स्थापन केली, तसेच ध्येय ठेवून आपणही प्रशासकीय अधिकारी व्हायचे हा संकल्प पूर्णत्वाला गेला. तो स्वप्नपूर्तीचा आनंद काही वेगळाच होता. 

१५८ वर्षांपूर्वी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी एक भव्य, उदात्त विचाराने शिक्षणाचे बीज महाराष्ट्रभूमीत पेरले. त्यांच्या समोर स्वप्न होते की, या संस्थेतून अशाप्रकारचे शिक्षण दिले जाईल की, ज्यायोगे विद्यार्थ्यांवर मानसिक, शारीरिक, बौद्धिक संस्कार होतील व नैतिकदृष्ट्या परिपूर्ण असलेली एक युवापिढी तयार होईल, जिचे राष्ट्रीय चारित्र्य भारतमातेच्या सेवेत सर्वस्वाचा त्याग करण्यास हसत-हसत तयार होईल. त्यावेळी त्यांना कदाचित वाटलेही नसेल की, म.ए.सो. च्या या लहान बीजाचे १५८ वर्षांनंतर एका महान ज्ञानवृक्षात रुपांतर होईल. त्यांनी ज्या स्वतंत्र भारत देशासाठी बलिदान केले त्या स्वातंत्र्याच्या रक्षणाची व भविष्यातील समृद्धीची एक मोठी जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. मला नेहमीच वाटत आले आहे की, १९४७ साली आपणांस फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळाले, स्वराज्य आणि सुराज्य खऱ्या अर्थाने अजून साकार व्हायचे आहे. देशातील बहुसंख्य जनता अजूनही दारिद्र्याच्या, अज्ञानाच्या, सामाजिक विषमतेच्या अंधारात खितपत पडली आहे. मला मनोमन वाटते की, १९४७ पूर्वीच्या राजकीय स्वातंत्र्याच्या लढाईपेक्षा या पुढील काळातील सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याची लढाई अधिक आव्हानात्मक आहे.

Read More >> MES Knowledge Tree

 

MES Alumni

 

 MES Alumni

 

 

 

MES Alumni